अनेक भारतीय विमा कंपन्या आहेत ज्यामध्ये मुळातच विमान-प्रवास रद्द करण्यासाठी संरक्षण दिले जात नाही. विविध विमा योजना प्रदात्यांचे या संदर्भातील सुरक्षा देण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे.विमान प्रवास रद्द झाला असेल तर त्याचे किती प्रमाणात तुम्हाला सरंक्षण मिळेल हे भारतातील तुम्ही निवडलेल्या प्रवास विमा योजनांच्या विशिष्ट अटी व शर्ती यावर अवलंबून असणार आहे. भारतीय प्रवास विम्यामध्ये समाविष्ट असलेल्या उड्डाण रद्दीकरण सरंक्षणाच्या संबंधात खालील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात:
१. विमान प्रवास रद्द होणे यासाठी सरंक्षण: या प्रकारचे संरक्षण सामान्यत: प्रवास विम्याच्या योजनाधारकांना अॅड-ऑन किंवा रायडर म्हणून उपलब्ध करून दिले जाते जे पूर्णपणे ऐच्छिक आहे. हे तुम्हाला नियमित मिळणाऱ्या सुरक्षेचाच एक भाग असेल अशी शक्यता याठिकाणी नाही त्यामुळे तुम्ही योजना जेव्हा विकत घेता तेव्हा तुम्हाला यासंदर्भातील सुरक्षा निवडणे आवश्यक आहे.
२. प्रीमियमची रक्कम: तुम्ही विमान प्रवास रद्द करणे या कारणासाठी संरक्षण मिळावे हा पर्याय जर निवडलात तर तुम्हाला हा विशिष्ट लाभ मिळवण्याच्या विशेषाधिकारासाठी अतिरिक्त हप्त्याची रक्कम भरावी लागेल. तुमच्या प्रवासाची एकूण किंमत आणि विमा कंपनीच्या किंमतींच्या संरचनेसह हप्त्याची किंमत ही अनेक परिस्थितींवर अवलंबून असल्याने त्यात बदल होवू शकतो.
३. यामध्ये खालील कारणांचा समावेश आहे: बहुतेक वेळा तुमच्या विमा योजनांमध्ये विशेषरित्या समाविष्ट असलेल्या कारणांपैकी एखाद्या कारणामुळे तुमची सुट्टी रद्द झाली असल्यास तुम्ही विमान प्रवास रद्दसाठी असलेल्या संरक्षणास पात्र असाल. तुमच्या योजनेला सुरक्षितता मिळवून देणाऱ्या ठराविक कारणांची खालील उदाहरणे आहेत: एखादा आजार किंवा दुखापत जी तुम्हाला प्रवास करण्यापासून थांबवते.
एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन किंवा एखाद्या जीवघेण्या आजाराचे निदान होणे.
नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या प्रवासाच्या ठिकाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे
प्रवास प्रदात्याचे आर्थिक नुकसान होणे किंवा आर्थिक थकबाकीदार म्हणून घोषित होणे (उदारहण- कोणतीही विमान सेवा देणारी संस्था)
न्यायालयीन कामकाज सेवेला उपस्थित राहणे किंवा न्यायालयात हजर राहण्याचा आदेश.
तुमच्या प्रवास परवान्यामध्ये (पासपोर्ट) किंवा व्हिसामध्ये त्रुटी असणे.
४. आधीपासून अस्तित्वात असलेल्या अटी: जोपर्यंत तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या अटी किंवा शर्ती यांना संरक्षण मिळवून देणारी योजना घेतली नसेल तर काही योजना पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय समस्यांशी संबंधित विमान प्रवास रद्द करण्याच्या सुरक्षतेला नाकारू शकतात. अशा अटींचे संरक्षण तुम्ही विकत घेतले असेल तर त्यातील ही गोष्ट आहे.
५. अचूक आणि तत्पर सूचना: जर तुम्ही अशा स्थितीमध्ये असाल की तुम्हाला तुमची सुट्टी रद्द करावी लागणार आहे, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या विमा प्रदात्यासोबत संपर्क साधणे अत्यावश्यक आहे. दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अनेक विमा योजना कंपनी या त्वरित अधिसूचनेची मागणी करतात.
६. दिलेल्या विधानाच्या समर्थनार्थ लागणारी कागदपत्रे: बहुतेकवेळी, तुमचा फ्लाइट रद्द करण्याचा दावा स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्र सादर करणे आवश्यक असते. वैद्यकीय प्रमाणपत्रे, मृत्यू प्रमाणपत्रे, उड्डाण रद्द झाल्याचा पुरावा आणि इतर कोणतेही समर्पक कागदपत्रे या श्रेणीत येऊ शकतात.
७. परताव्याच्या स्वरूपात किंवा परतफेडीच्या स्वरूपात देयक: तुमचे विमान प्रवास रद्दीकरण संरक्षण तुम्ही घेतलेल्या परतावा मिळवून देणाऱ्या प्रवासासाठी किंवा तुमच्या सुट्टीतील न वापरलेल्या भागासाठी परतावा प्रदान करू शकते. म्हणूनच तुमच्या योजनेमधील संरक्षणाच्या अटींची तुम्हाला खात्रीपूवर्क माहिती असणे आवश्यक आहे.
८. सरंक्षण मर्यादा: प्रवास विमा योजनांमध्ये वारंवार विमान प्रवास रद्द करण्यासाठी संरक्षण मर्यादांचा समावेश होतो. याचा अर्थ असा आहे की विमा प्रदात्याकडून दावा दाखल झाला तर अशावेळी विमाकर्ता योजनाधारकांना जास्तीत जास्त रक्कम देण्यास तयार आहे. सरंक्षणाची कमाल रक्कम तुमच्या प्रवासाच्या एकूण खर्चाच्या रकमेशी मिळतीजुळती आहे का हे तपासा.
९. योजनेला अपवाद ठरणाऱ्या गोष्टी: रद्द केलेल्या विमान प्रवासासंबंधित असलेल्या कोणतेही अपवाद किंवा मर्यादांशी चांगल्याप्रकारे परिचित होण्यासाठी तुमच्या प्रवास विमा योजनेच्या अटी काळजीपूर्वक वाचा. प्रवासासंदर्भात मनपरिवर्तन होणे , विशिष्ठ व्यावसायिक वचनबद्धता, किंवा विमा विकत घेताना आजूबाजूच्या घटनांचा परिणाम म्हणून होणारे रद्दीकरण ही अशा प्रकारच्या परिस्थितींची उदाहरणे आहेत ज्यांना वगळले जाऊ शकते.
विमा खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही निवडलेल्या प्रवासा विमा योजनेच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.यामध्ये विमान प्रवासा रद्द करण्याच्या कोणत्याही वैकल्पिक संरक्षण अटींचा सुद्धा समावेश आहे. विमान प्रवास रद्द होण्याबाबत तुम्हाला काही विशेष काळजी किंवा समस्या भासत असेल तर तुमच्या आगामी प्रवासाच्या योजनांसाठी तुम्हाला आवश्यक असलेले सरंक्षण मिळत आहे का याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही विमा प्रदात्याशी किंवा विमा प्रतिनिधींसोबत याबद्दल चर्चा करण्याचा विचार करू शकता.
Komentarze